kormo_jobs_marathi

तुम्ही नोकरी शोधात आहात पण, तुम्हाला हे समजत नाहीये कि कुठे आणि कसं तुम्ही नोकरी शोधू शकता! तर हा लेख नक्की वाचा म्हणजे तुम्हाला कळेल कि  कोणता आहे ऑनलाईन नोकरी शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग! आजकालच्या कठीण काळात, नोकरी शोधण्याच्या पद्धतीला सोपं करण्यासाठी गूगल घेऊन आला आहे एक नवीन आणि सोपं ‘कोरमो जॉब्स’ अँप, जिथे तुम्ही ऑनलाईन जॉब्स मधून आपल्याला आवडीच्या नोकरी साठी अर्ज करू शकता. आणि ह्या अँप ला ऑनलाईन डाउनलोड करून अगदी काही क्लिक मध्ये तुमच्या आवडीचा आणि कौशल्य नुसार नवीन नोकरी शोधू शकता.

गूगल आणि जोश टॉक यांनी एकत्र येईन तुमच्या पर्यंत अनेक एन्ट्री लेव्हल च्या नोकर्या पोहोचवण्याचं काम सुरु केलं आहे. आता तुम्ही नोकरी देणार् यांबरोबर बोलून आपल्या आवडीच्या नोकरीसाठी अर्ज करू शकता.

जर तुम्ही सुद्धा एन्ट्री लेवल नोकरीच्या शोधात असाल तर  8th Oct 2020   या तारखेला सकाळी 11:30 AM वाजता ऑनलाईन सेमिनार मध्ये नक्कीच उपस्थित राहा.

ह्या ऑनलाईन सेमिनार मध्ये तुम्हाला कोरमो जॉब्स बद्दल सगळी माहिती मिळेल जसं:

  1. कोरमो जॉब्स काय आहे आणि ह्याच्या मदतीने कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या शोधू शकता.     
  2. तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या एंट्री लेवल नोकर्यांबद्दल परिपूर्ण माहिती घेऊ शकता.
  3. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तुम्हाला नोकरी शोधण्यासाठी काही टिप्स सुद्धा मिळतील कि तुमचे कामातील कौशल्य कसे वाढवावे. 

कोरमो जॉब्स का वापरावे?

1. स्वतः आपल्या आवडीची नोकरी शोध अगदी मोफत. 

2. आपल्या कौशल्य आणि आवडी नुसार नोकरी बघा.

3. विश्वासू आणि पडताळणी केलेले नोकरी देणारे.
4. आपला CV मोफत बनवा 

5. नवनवीन कौशल्य शिका.

6. नोकरीची मुलाखत शेड्युल करा आणि त्याचा पाठपुरावा करा. 

कोरमो जॉब्स अँप नक्की काय आहे?

कोरमो जॉब्स हे एक गूगल च विश्वासू अँप आहे जे भारतामध्ये नुकतंच सुरु केलं आहे. ह्या अँप चे ध्येय एकच आहे ते म्हणजे लोकांना ऑनलाईन नोकऱ्या शोधण्यासाठी मदत करणे. यात तुम्ही कुठूनही कोणत्याची लोकेशन ची एन्ट्री लेवलच्या नोकरी शोधून, त्यांना अर्ज करू शकता. कोरमो जॉब्स तुम्हाला हजारो पर्याय उपलब्ध करून देतात. आणि त्यातून तुम्ही तुमच्या आवडी आणि कौशल्यानुसार नोकरीला अर्ज करू शकता. कोरमो जॉब्स हे अँप अगदी विश्वासू आणि इथे असणारे नोकरीदाते हे वेरिफाईड आहेत.

हे अँप फक्त नोकरी शोधण्यासाठीच नाही तर तुमचे व्यवहारिक जीवनातील कौशल्य वाढवण्यासाठी मदत करते. कोरमो जॉब्स वर तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता. जसे कि, आपला  CV आकर्षक कसा बनवता येईल, आणि नोकरी ची मुलाखत यशस्वी  रित्या कशी पार पाडावी.

कोरमो जॉब्स वर तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता. जसे कि, आपला CV आकर्षक कसा बनवता येईल, आणि नोकरी ची मुलाखत *यशवासवी*(यशस्वी) रित्या कशी पार पाडावी.कोरमो जॉब्स च्या अँपच्या मदतीने भारतातील लाखो लोक घरबसल्या एंट्री-लेवल नोकऱ्यासाठी अर्ज करू शकतात आणि ते सुद्धा कुढल्या प्रकारची फी न भरता.

कोरमो जॉब्स च्या मदतीने नोकरीसाठी कसा अर्ज कराल?

स्टेप 1: अँड्रॉइड फोनमध्ये प्ले स्टोर मध्ये जाऊन ‘कोरमो जॉब्स’ हे अँप डाउनलोड करा.

स्टेप 2: ‘कोरमो जॉब्स’ अँप इन्स्टॉल झाल्यानंतर, ते ओपन करून तुम्ही त्यात तुमचा फोन नंबर, तुमचं प्राधान्य असलेलं कामाचं ठिकाण आणि तुमचं कार्यक्षेत्र निवडून प्रोफाईल तयार करा.

स्टेप 3: या नंतर काही महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला तिथे भराव्या लागतील उदाहरणार्थ, तुमच्या कामाचा अनुभव, पत्ता, इत्यादी. आणि तसेच नोकरी मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही तुमचा CV तिथे अपलोड करू शकता.

Step 4: आता तुम्हाला तुमच्या आवडी आणि कौशल्या नुसार हजारो नोकरीदात्यांकडून लिस्ट केलेल्या नोकऱ्या आणि त्या नोकर्यांबद्दल सगळी माहिती उपलब्ध असेल. 

Step 5: तुम्ही तुमच्या आवडीच्या नोकरीसाठी ‘Apply’ वर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता.

Step 6: नोकरीसाठी अर्ज केल्या नंतर तुम्ही त्या अर्जाचा पाठपुरावा करून नोकरीसाठी मुलाखत शेड्युलसुद्धा करून सोप्यापद्धतीने सगळं मॅनेज करू शकता.

टीप: हे लक्षात ठेवा कि तुम्ही तुमची प्रोफाइल वेळोवेळी अपडेट करत रहा. करण कि, यामुळेच तुमचे नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

इथे क्लिक करून Kormo Jobs कोरमो जॉब्स अँप डाउनलोड करून तुमच्या नोकरीच्या शोधला नवीन मार्ग देऊ शकता.

कोरमो जॉब्स बरोबर शिका नवनवीन कौशल्य

कोरमो जॉब्स अँप मध्ये फक्त नोकरी शोधणेच नाही तर स्किल बिल्डिंग मॉड्युल्स सुद्धा उपलब्ध आहेत. ह्या मॉड्युल्स च्या मदतीने तुम्ही नोकरी संदर्भात बऱ्याच नवीन गोष्टी शिकू शकता जसे कि: 

CV तयार करणे:

जेव्हा तुम्ही कुठे नोकरी साठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला सर्वात पाहिजे तुमचा CV मागितला जातो. CV एक फॉर्मल डॉक्युमेंट असत. ज्यात तुमच्याबद्दल नोकरीकरिता लागणारी पात्रता, तसेच नोकरी चा अनुभव आणि तुमची कौशल्यांची माहिती असते. आता तुम्ही कोरमो जॉब्स अँप च्या मदतीने मोफत CV बनवू शकता. 

नोकरी शोधणे: 

नोकरी शोधण्यासाठी म्हणून ‘गूगल चे कोरमो जॉब्स’ हे खूप उपयुक्त्त अँप आहे. ज्यात तुम्ही अगदी ३-४ क्लिक वरून अगदी सोप्या पद्धतीने नोकरी शोधून त्यांना अर्ज करू शकता. नोकरी शोधत असताना तुम्हाला तुमच्या कौशल्य आणि कार्यक्षेत्र या बद्दल माहित असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला माहित असेल कि तुम्ही कुठल्या नोकरीत फिट बसू शकता.

मुलाखतीचे कौशल्य:

एकदा का तुमचा CV शॉर्टलिस्ट झाला कि त्या पुढची पायरी असते ती मुलाखत आणि हाच एक महत्वाचा भाग असतो ज्यात ठरवलं जात कि तुम्हाला नोकरी मिळणार कि नाही. त्यामुळेच नोकरीच्या मुलाखतीसाठी काही टिप्स असतात ज्याच्या मदतीने नोकरीसाठीची मुलाखत यशस्वीरीत्या पार पडू शकता. 

interview_marathi

आचरण आणि ग्रूमिंग:

तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी फक्त व्यावहारिक कौशल्याचीच नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा काम करावं लागत. एक चांगला व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. जसे कि, स्वतःची शिस्तबद्धता, कामाबाबत तत्परता, आचरण इत्यादी.

जर तुम्ही सुद्धा स्वतः साठी नोकरी शोधात आहात तर आत्ताच कोरमो जॉब्स अँप आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करा आणि हजारो नोकऱ्याच्या पर्यायातून आपल्याला हवी ती नोकरी निवडून तिथे अर्ज करा. 

तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असल्यास खाली तुम्ही कंमेंट मध्ये ती लिहा, आम्ही तुमच्या शंकांना उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here